esakal | अरे बापरे या जिल्ह्यात पाच दिवसांत 8 मृत्यू !
sakal

बोलून बातमी शोधा

1800x1200_virus_3d_render_red_03_other.jpg

बुधवारी एकाच दिवशी दोन मृत्यू

अरे बापरे या जिल्ह्यात पाच दिवसांत 8 मृत्यू !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. अशातच दररोज मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 6 ते 10 जून या पाच दिवसांत आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, या पाच दिवसांत तीन वेळा एकाच दिवशी दोन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे संक्रमण थैमान घालत असून, रुग्णांच्या आकडा नऊशेकडे आगेकूच करीत आहे. तर एका आत्महत्येसह 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेले बहुतांश रुग्ण हे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी ग्रासलेले होते. मृतांमध्ये सर्वाधित रुग्ण हे 60 वर्षे वयाच्या पुढची आहेत. जिल्ह्यात एप्रिलअखेरपर्यंत कोरोनाचे चार बळी गेले होते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून हा आकडा वाढत गेला. जूनच्या पहिल्याच आठवड्यातही कोरोनाची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.

पाच दिवसांत असे झाले मृत्यू
तारीख                 मृत्यू (संख्या)
१० जून                 २
९  जून                  १
८ जून                   २
७ जून                   १
६ जून                   २

का वाढतोय मृत्यूदर?
अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या पॉझिटिव्ह अहवाल येण्याची संख्या ही 884 ऐवढी झाली आहे. अशातच 41 जणांचा मृत्यू आणि एक आत्महत्या असे एकुण 42 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर का वाढत आहे. आरोग्यमंत्री येऊन सूचना देऊनही कोणताच बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे.