एक फोन आणि मदतीसाठी आर्मी हजर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

कोरोना संकटात सामजिक उपक्रमातून गरजूंना मदतीचा हात देण्याचे काम अकोल्यातील रॉबिन हूड आर्मी सातत्याने करीत आहे. केवळ कोरोनाच्या संकाटतच नव्हे तर मागील 10 महिन्यांपासून समाजातील लोकांच्या आयुष्यात आशेचा दीप पेटविण्यात ही आर्मी खारीचा वाटा उचलत आहे.

अकोला: शहरापासून 17 किमी अंतरावर असलेल्या घुसरवाडी... गावात एक 85 वर्षांची आजी एकटीच... तिची मुलगी दिल्लीला....लॉकडाउनच्या काळात असहाय्य परिस्थितीत अटकलेली...एके दिवशी दिल्लीवरून आजीच्या मुलीचा फोन खनखनला... अन् अकोल्यातील रॉबिन्स आजीपर्यंत मदत घेवून पोहोचले. होय हे एखादे कथानक वाटवे, अशी अकोल्यातील रॉबिन हूड आर्मी कोरोनातील अंधकारमय संकटात गरजूंपर्यंत आशेचा दीप बनून पोहोचत आहे.

कोरोना संकटात सामजिक उपक्रमातून गरजूंना मदतीचा हात देण्याचे काम अकोल्यातील रॉबिन हूड आर्मी सातत्याने करीत आहे. केवळ कोरोनाच्या संकाटतच नव्हे तर मागील 10 महिन्यांपासून समाजातील लोकांच्या आयुष्यात आशेचा दीप पेटविण्यात ही आर्मी खारीचा वाटा उचलत आहे. दर रविवारी अन्न वाटप, मुलांना शिकवणे हे नित्य उपक्रम जोमाने सुरू असतात. जून 2019 पासून रॉबिन हूड आर्मी अकोल्यात काम करत आहे .त्यासाठी निष्ठावान रॉबिन्सची टीम रेल्वे स्टेशन, मोठी उमरी, सरकारी दवाखाना, बागातली देवी, मातोश्री वृद्धाश्रम, सूर्योदय बालगृह येथे जाऊन मदत करीत आहे. मातानगरमध्ये राहणाऱ्या लहान मुलांना दर रविवारी शिकवण्याचे काम ही आर्मी करते. शहरात कार्यक्रम, उत्सव, लग्न, भंडारा आदी ठिकाणी अन्न वाया जाऊ नये म्हणून रॉबिन हूड आर्मी भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचवण्याचे काम करते.

मिशन एक्स
भविष्यात लॉकडाउन उघडल्यावर रॉबिन हूड आर्मी 'मिशन एक्स’ उपक्रम राबवणार आहे. ज्यात गरजूंना अन्नदान , लहान मुलांना शिक्षण साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले जाईल. त्यासाठी ‘डोनेशन ड्राईव्ह’ सुरू झालेली आहे. सध्या ज्यांना अन्नधान्य दान करायचं आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन नीलेश गोदानी (7030954902), भूषण आसरे (7030704143) यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One call and army reach help, Akola Robin hood army help poor man