बाळापुरातील एकाचा मृत्यू, आणखी 49 रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अकोल्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवारी 144 अहवालापैकी 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 95 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अकोला ः अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराकडे आगेकूच करीत आहेत. अशातच शुक्रवारी (ता.12) प्राप्त झालेल्या एकुण 144 अहवालापैकी 49 अहवाल पॉझिटिव्ह आले असून, 95 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यातच आज पुन्हा एका वृद्धाचा मृत्यू झाला. हा व्यक्ती बाळापूर येथील रहिवासी होती. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अकोल्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. शुक्रवारी 144 अहवालापैकी 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 95 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज सकाळी प्राप्त अहवालात 22 महिला व 27 पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ,  अकोटफैल येथील सात,  शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन,  मोठी उमरी येथील तीन,  खदान येथील तीन,  रेल्वे क्वार्टर येथील तीन,  गुलजार पुरा येथील तीन,  सिंधी कॅम्प येथील दोन, पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर  तारफैल, संतोषी माता मंदिर जवळ,  छोटी उमरी,  गितानगर,  विजय नगर, शंकर नगर,  भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 

नऊ जणांना डिस्चार्ज
 गुरुवारी सायंकाळनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले.

एकाचा मृत्यू
दरम्यान गुरुवारी (ता.11) रात्री एका 78 वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेतांना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-963
मयत-44(43+1),डिस्चार्ज-586
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-333 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One died in Balapur, adding 49 more patients