
अकोला ः टाळेबंदी काळात सरकारने आता घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, ही दारू खरेदी करण्यासाठी त्या नागरिकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना घेणे आवश्यक आहे. यासाठी 1 एप्रिल ते 2 जूनपर्यंत शहरातील तब्बल 751 जणांनी आॅनलाइन परवाने काढले असून, शहरातील चार वाईन शाॅपीमधून होम डेलेव्हरीही दिली जात आहे.
सरकारने मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. याची अंमलबजावणी राज्य उत्पादन शुल्क खाते करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. अशा परिस्थिती संबंधित व्यक्तीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाते. त्या व्यक्तीस शिक्षा किंवा जामीन देण्याचा निर्णय न्यायाधीश घेतात. महाराष्ट्रात परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इत्यादी ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आहेत. (म्हणजे वीस वर्षापर्यंतचे तरुण कायद्याने मद्यपान करू शकत नाहीत.) हा परवाना 1 दिवस, 1 वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो.
घरपोच दारु मिळवण्यासाठी 'या' आहेत अटी
परमिट रूम, वाईन शॉप किंवा जेथून मद्यविक्री होते अशा ठिकाणी 1 दिवसाचा परवाना मिळू शकतो. यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाते. सध्याची लॉकडाउनची परिस्थिती पाहता हा परवाना आता ऑनलाइन मिळण्याचीही सोय आहे. त्यासाठी www.exciseservices.mahaonline.gov.in या विभागांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे.
शंभर रुपयांत वर्षभरासाठी तर हजारात आयुष्यभराचा परवाना
एक वर्ष किंवा आजीवन परवाना मिळवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत वय व रहिवास सिद्ध करणारी कागदपत्रे (पॅन किंवा आधार) जोडावी लागतात. एका वर्षाची 100 तर आजीवन परवान्याची फी 1000 इतकी आहे.
शहरात काही वाईन शाॅपीनी मद्यविक्री सुरू केली आहे. की ज्या कंटेन्मेंट झोनमध्ये नाहीत. असे असतानाही या वाईन शाॅपीमधून मद्य खरेदी करण्यासाठी परवान्याची गरज असून, नागरिकांनी कार्यालयातून परवाना काढावा.
-स्नेहा सराफ, अधीक्षिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.