esakal | कोरोनाग्रस्तांसाठी केवळ १०० खाटाच उपलब्ध!

बोलून बातमी शोधा

कोरोनाग्रस्तांसाठी केवळ १०० खाटाच उपलब्ध!
कोरोनाग्रस्तांसाठी केवळ १०० खाटाच उपलब्ध!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाबाधितांवर उपचारात कृत्रिम प्राणवायू सध्या मोठी भूमीका बजावत आहे. त्यामुळे राज्यात सध्या कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा भासत आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची स्थिती सुद्धा वेगळी नाही, कारण जिल्ह्यातील रुग्णांसाठी सुद्धा कृत्रिक ऑक्सिजन मुबलक नसले तरी ते प्रमाणात उपलब्ध होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना सद्या ऑक्सिजनच्या खाटांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रुग्ण अधिक व खाटा कमी असल्याने अनेकांना वेटिंगवर रहावे लागत आहे. गुरुवारी (ता. २९) कोरोना रुग्णांसाठी केवळ १०० खाटा उपलब्ध राहिल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची खाट मिळवण्यासाठी धावाधाव सुद्धा झाली.

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्यामुळे या रोगाने ग्रस्त असलेल्यांना औषधोपचाराचा एक भाग कृत्रीम प्राणवायू देण्यात येत आहे. परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. काही ठिकाणी तर रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते दगावल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.

त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्वच जिल्ह्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा मुबलक साठा तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व मूर्तिजापूर येथील रुग्णालयात प्रत्येकी एक या प्रमाणे तीन ऑक्सिजन प्लॉन्ट तयार करण्यात आले आहेत. परंतु असे असले तरी संध्या आवश्यकतेच्या तुलनेत जिल्ह्यात कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्णांनाही खाटा मिळने दुरापास्त झाले आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

- जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या १ हजार १७४ खाटा आहेत. त्यापैकी १ हजार ७४ खाटांवर रुग्ण भरती असल्याने त्या व्यस्त आहेत. परंतु उर्वरित १०० खाटांसाठी अधिक रुग्ण वेटिंगवर असल्याने ऑक्सिजनच्या बेडसाठी रुग्ण व नातेवाईकांची धावाधाव झाल्याचे दिसून आले.

- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी (ता. २९) सायंकाळी ऑक्सिजनच्या २०, आरकेटीमध्ये १३, जिल्हा स्त्री रुग्णालयात आठ तर मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात ५ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध होत्या.

- जिल्ह्यातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये ५४ खाटा रिक्त असल्याची माहिती मिळाली.

संपादन - विवेक मेतकर