
अकोला : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित, शांततामय वातावरण देण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. अशाच १२३ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच, नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल एक लाख तीन हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला.