श्री क्षेत्र पोहरदेवीत कोरोनाचा प्रकोप; पूर्ण गाव कंटेन्मेंट झोन

श्री क्षेत्र पोहरदेवीत कोरोनाचा प्रकोप; पूर्ण गाव कंटेन्मेंट झोन जाहीर
श्री क्षेत्र पोहरदेवीत कोरोनाचा प्रकोप; पूर्ण गाव कंटेन्मेंट झोन
Updated on

मानोरा (जि.वाशीम) ः तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी (Shri Kshetra Pohardevi) येथे गेल्या आठवडा भरापासून कोरोनाचा (Corona) प्रकोप वाढत असल्यामुळे तहसीलदार शारदा जाधव यांनी बुधवारी (ता.१२) १४ दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन (Containment zone) जाहीर केल्याचे पत्र काढल्यामुळे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन त्यासंबंधी उपाय योजनेकरिता कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्री क्षेत्र पोहरादेवी येथे कोरोना आजाराने पुन्हा एकदा हैदोस सुरू केल्याने काही दिवसात सातत्याने गावातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पहावयास मिळत आहे. Outbreak of corona in Shri Kshetra Pohardevi; Full village containment zone

आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५, साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू झाल्याने तहसीलदार शारदा जाधव यांनी बुधवारी पोहरादेवी गावाला कंटेन्मेंट झोन जाहीर केल्याचे आदेश काढून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी मानोरा पोलिस स्टेशन व गटविकास अधिकाऱ्यांनी करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांनी कोरोना आजार बाबत कंटेंन्मेंट प्लान निर्धारित केला असून, त्यानुसार बाधित व्यक्ती समुदायच्या केंद्र बिंदू पासून तीन की.मी. च्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालून मज्जाव करण्याबाबत निर्देश केल्याने तहसीलदार जाधव यांनी १४ दिवस कंटेंन्मेंट झोन जाहीर केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Outbreak of corona in Shri Kshetra Pohardevi; Full village containment zone

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com