Akola News : अकोला जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या दीड लाखांवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यासाठी सात लाख पुस्तक संच उपलब्ध होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे.
अकोला : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तक सुविधेचा जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दीड लाखांवर विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यंदा सात लाख पाठ्यपुस्तकांच्या संचाची मागणी नोंदवण्यात आली आहे.