
अकोला : जून महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४ हजार २१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली असून, त्यासाठी ६ काेटी ५ लाख ५६ हजारांची आवश्यकता आहे. याबाबत संयुक्त सर्व्हेक्षण झाल्यानंतर कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने तयार केलेला संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना सादर केला.