पडळकर तुम्हाला धनगर समाजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही 

मनोज भिवगडे
Thursday, 25 June 2020

धनगर समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून, भाजपच्या विरोधात गरळ ओकली. नंतर स्वार्थासाठी त्याच पक्षाशी घरोबा केला. त्यामुळे आमदार गोपीनाथ पडळकर तुम्हाला धनगर समजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही आदरनिय शरद पवार साहेंबाची आधी माफी मागा.

अकोला : धनगर समाजाला आरक्षण दिले नाही म्हणून, भाजपच्या विरोधात गरळ ओकली. नंतर स्वार्थासाठी त्याच पक्षाशी घरोबा केला. त्यामुळे आमदार गोपीनाथ पडळकर तुम्हाला धनगर समजाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही आदरनिय शरद पवार साहेंबाची आधी माफी मागा, असा इशारा वजा आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे.  

 

देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा माजी आमदार हरिदास भदे यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून, अशा वरीष्ठ नेत्यावर टिका करण्याची पडळकर यांची पात्रता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्याबद्दल भाजपच्या सर्वच नेत्यांनी असहमती दाखवल्यामुळे पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुद्धा हरिदास भदे यांनी केली आहे. पुढे बोलताना भदे म्हणाले की, पडळकर हे धनगर आरक्षणावर बोलण्याचा आता नैतिक अधिकार गमावून बसले आहेत. कारण त्यांच्या पक्षाने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा शब्द दिला होता व पडळकरांनी सुद्धा माझे आई किंवा वडील जरी भाजपच्या तिकीटावर उभे राहले तर मतदान करू नका असे आवाहन केले होते व तेच भाजपात गेले. हे सर्व धनगर समाज अजून विसरला नाही. केंद्रात व राज्यात तुमच्या भाजपची सत्ता असताना धनगरांना आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे तुम्ही धनगर आरक्षणावर बोलू नये असे सुद्धा भदे म्हणाले.

 

भाजपची बहुजनांबद्दलची धेय्य धोरणे तपासावी
पवार साहेबांनी बहुजन समाजाला फसवण्याच्या संदर्भात पडळकरांनी मनुवादी भाजपची बहुजनांबद्दलची धेय्य धोरणे तपासावी असाही सल्ला भदे यांनी दिला. मतांवर डोळा ठेवून घोषणा केलेल्या एक हजार कोटीची कोणतीही आर्थिक तरतूद भाजपने जाता-जाता केली नाही किंवा रुपयाही खर्च केला नाही. भाजप म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे, असे सुद्धा ते म्हणाले व म्हणून पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असे आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padalkar, you have no right to talk about Dhangar Samaj