

Officials inaugurate the newly constructed 33 KV electricity substation at Parad in Akola district.
esakal
अकोला : मुर्तीजापूर तालुक्यातील पारद येथे महावितरणच्या नवनिर्मित ३३ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २७) खासदार अनुप धोत्रे, आमदार हरिश पिंपळे आणि महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील सात गावांमधील घरगुती तसेच कृषी ग्राहकांना अधिक दर्जेदार, सुरळीत आणि अखंडित वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.