
मोताळा : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी अद्यापही सार्वत्रिक व दमदार पाऊस नसल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट परिस्थिती निर्माण झाली आहे. एकही पूर नदी-नाल्यांना गेला नसल्याने जलपातळी जैसे थे आहे. आता दमदार पावसासाठी पिके व शेतकरी दोन्ही आसुसलेली दिसत आहेत.