esakal | पालकांनो, आरटीईची प्रवेशासाठी आहे फक्त ११ दिवसांची मुदत
sakal

बोलून बातमी शोधा

RTE

पालकांनो, आरटीईची प्रवेशासाठी आहे फक्त ११ दिवसांची मुदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी पहिली साेडत ता. ७ एप्रिल रोजी पुणे येथे ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सोडतीमध्ये नंबर लागलेल्या पालकांना एसएमएस मिळाले नाही. परंतु त्यांच्या संकेतस्थळावरिल लॉगिनमध्ये सोडतीत त्यांची निवड झाल्याचा उल्लेख करण्याता आला असून, संबंधितांना प्रवेशासाठी ११ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया १९ एप्रिलपासून सुरू होईल व ३० पर्यंत संबंधितांना प्रवेश घेता येईल.


बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.

दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ४ हजार ७२७ ऑनलाईन अर्ज करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त १ हजार ९६० अर्ज आले आहेत. हे सर्व अर्ज छाननीमध्ये पात्र ठरल्यास तब्बल २ हजार ७६७ विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान प्रवेशासाठीची पहिली सोडत गुरुवारी (ता. १५) शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.

  • प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

  • प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.

  • आरटीई पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमी पत्र आणि

  • लॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे. पडताळणी समितीकडे

  • वेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये.

  • मुदतीनंतर प्रवेशाचा हक्क नाही
    आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली होती. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २१ मार्चपर्यंत निश्चित केली होती, परंतु पालकांना ओटीपी मिळण्यास तांत्रिक खोडा निर्माण झाल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना ३० मार्चपर्यंत अर्ज करता आले. त्यामुळे माेठ्या संख्येने पालकांनी अर्ज केले. दरम्यान आता निवड झालेल्या पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश मुदतीत करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेशासचा हक्क मिळणार नाही.

    संपादन - विवेक मेतकर