corporator parag gawai
sakal
- श्रीकांत राऊत
अकोला - सर्वोपचार रुग्णालयात आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी भटकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ राज्यभर चर्चेचा विषय ठरल्यानंतर अखेर संबंधित रुग्णावर उपचार सुरू झाले आहेत. या प्रकरणाची दखल शासन स्तरावर घेतली गेल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी पुढाकार घेत संबंधित कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.