

Akola
esakal
अकोला: शिक्षणसेवक व शिक्षक भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असताना अनेक शैक्षणिक व्यवस्थापनांनी अद्याप रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनांना दिलासा देत जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली असून, आता १० जुलै २०२६ पर्यंत जाहिराती अपलोड करता येणार आहेत.