मोदी सरकार विरोधात पेन्शनधारकांचे हल्लाबोल आंदोलन 

Pensioners' agitation against Modi government akola marathi news
Pensioners' agitation against Modi government akola marathi news

अकोला ः ईपीएस पेंशनधारकांना दरमहा तीन हजार रुपये पेंशन देण्याच्या मागणीसाठी ईपीएस पेंशनधारक संघर्ष समिती आयटकच्या वतीने बुधवारी (ता. १ जुलै) मोदी सरकारविरोधात उपोषण करुन हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने आंदोलनास परवानगी नाकारल्यामुळे आंदोलक आपल्या सोईनुसार आंदोलन करतील. त्यानंतर २ जुलै रोजी भविष्य निर्वाह निधी आयुक्त व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून आक्रोष व्यक्त करतील.

तत्कालीन युपीए सरकारने ईपीएस पेंशनधारकांच्या मागणीसाठी सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. सदर समितीने पेंशनधारकांना तीन हजार रुपये अधिक महागाई भत्त देण्याचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करुन सरकारला दिला होता. परंतु सदर अहवालाची अंमलबजावणी रखडली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले परंतु त्यामध्ये कोणत्याच प्रकारची तरतूद पेंशनरांसाठी केली नाही. परिणामी ईपीएस पेंशनधारक संघर्ष समिती आयटकच्या वतीने १ जुलै रोजी मोदी सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन देवराव पाटील, रमेश गायकवाड, मुकुंदराव गावंडे, वसंतराव दही, नयन गायकवाड व इतरांनी केले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com