Akola News: अफवांच्या बाजारानंतर पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या रांगा; इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा; उन्हाचे चटके सहन करीत नागरिक पेट्रोल पंपावर

Social Media Rumors Trigger Petrol Rush in Akot: अकोटमध्ये पेट्रोल पंपावरील अफवेमुळे गर्दी, इंधन तुटवडा; प्रशासनाने पुरेशा साठ्याची हमी दिली, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोट: भल्या पहाटे समाजमाध्यमावर पेट्रोल संपणार असल्याच्या अफवाच्या मेसेजमुळे अनेकांची धांदल उडाली. नागरिक सकाळीच शहराबरोबरच शहराबाहेरील पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदीसाठी गर्दी करताना दिसले. त्यामुळे काही पेट्रोल पंपावरील पुरवठा संपून गेला होता. अफवाच्या बाजारामुळे गरज नसतानाही अनेकांनी वाहनात पेट्रोल साठवून ठेवल्याने गरजूंना शहरात पेट्रोलसाठी भटकंती करावी लागली होती.

शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात साठा आहे. कोठेच इंधनाचा तुटवडा नाही. सर्व पेट्रोल पंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात असून, नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये, असे जाहीर आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com