

Conservation Efforts: PKCT-1 Tiger Moved to Safe Habitat
esakal
बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे, अस्वल, तडस अशा हिंस्त्र पशुंच्या सोबतीला आता वाघ आला आहे. आज ४ जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पुरुष जातीचा पीकेसीटी-1 नावाचा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात देव्हारी आणि बोरखेड-तारापूर जंगलाच्या बाजूने सोडण्यात आला आहे. याठिकाणी बंदीस्त जाळी आहे. विशेष म्हणजे या वाघाने आज सकाळी एक शिकारही केली आहे. असे वन विभागाने कळविले आहे.