अकोला - विवाह सोहळ्यासाठी जात असलेल्या एका युवकाला आणि त्याच्या वाहनचालकास केवळ किरकोळ अपघातानंतर कामरगाव पोलीस चौकीत नेऊन एफआयआर नोंदविल्याशिवाय तासन्तास अन्न-पाण्याविना डांबून ठेवत, पैशांची मागणी करून मारहाण केल्याची गंभीर घटना १६ मे रोजी घडली आहे.