चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आलेल्या दोन गावठी पिस्तुल व एक काडतुसा सह दोघा आरोपीस अटक

अशोक रावणकर
Friday, 11 September 2020

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आलेल्या दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस व मोटरसायकलसह दोघा आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

मलकापूर (अकोला) : शहर पोलिसांना बातमीदाराकडून मिळालेल्या गुप्त माहिती वरून शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आलेल्या दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस व मोटरसायकलसह दोघा आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत ८०,५०० रूपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, आरोपी सागर संजय भंगाळे वय २५ वर्ष रा. सरस्वती नगर वरणगांव, संजय गोपाळ चंदेले वय 45 रा.दर्यापुर हे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आपल्या विना नंबरच्या मोटरसायकलने दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस चोरट्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन येत आहे. तर या माहितीवरून पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे अधिकारी ऐ.पी.आय श्रीधर गुठ्ठे, ऐ.पी.आय चंद्रकांत ममताबादे, ASI रतनसिंह बोराडे, NPC जितेंद्र सपकाळे, PC समाधान ठाकुर, अनिल डागोर, ईश्वर वाघ, शशिकांत शिंदे, गजानन काळवाघे, वसीम शेख, सलीम बर्डे, योगेश जगताप यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार एक इसम आढळून आल्याने त्याची विचारपूस करत झडती घेतली असता. 

त्याच्याकडून दोन गावठी बनावटीच्या गावठी पिस्तुल किंमत ३०,००० रूपये, एक जिवंत काडतुस किंमत ५०० रूपये, एक बजाज कंपनीचे मोटरसायकल किंमत अंदाजे ५०,००० असा एकूण ८०,५०० रूपयांच मिळून आलेल्या मुद्देमालासह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीविरूध्द अप.क्र ५२२/२०२० कलम ३, २५ शस्त्र अधिनियम कलम १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम नुसार दाखल करण्यात आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested those who had come to Malkapur to sell pistols and cartridges