जागेच्या वादावरुन रस्त्यावर भांडण; एकमेकांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

जठारपेठ ते उमरी मार्ग दरम्यान असलेल्या स्टार मार्केट येथे जागेच्या वादावरुन दोन डॉक्टरांमध्ये रस्त्यावर भांडण होवून एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

अकोला : जठारपेठ ते उमरी मार्ग दरम्यान असलेल्या स्टार मार्केट येथे जागेच्या वादावरुन दोन डॉक्टरांमध्ये रस्त्यावर भांडण होवून एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनला डॉक्टरांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली. दोघांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

सविस्तर वृत्त असे की, उमरी मार्गावर स्टार मार्केट येथे डॉ. अरविंद नारायण मत्तलवार व डॉ. गुप्ता यांचे २००५ पासून क्लिनिक होते. २०१० मध्ये डॉक्टर गुप्ता यांनी आजारी असल्याच्या कारण वरून क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डॉ. मत्तलवार यांनी मुलांचे शिक्षण व इतर कारणे समोर करून क्लिनिक स्वतः चालविणे सुरू केले. मात्र, गेल्या काही दिवसात रुग्णालय जागा भाड्याने देणे सुरू केल्याने डॉ. गुप्ता व मत्तलवार यांच्यामध्ये वाद सुरू झाले. ही जागा खाली करून देण्यात यावी, अशी मागणी केल्याने स्टार मार्केट येथे डॉ. अरविंद मत्तलवार व डॉ. माखन गुप्ता या डॉक्टरांकडून चार ते पाच लोकांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली.

याप्रकरणी डॉ. अरविंद नारायण मत्तलवार व मोहिनी माखन गुप्ता यांनी सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला एकमेकांविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी एकमेकांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, ३२३, ५०४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have also registered a case against the two for arguing over a land dispute in Akola