Accident News : 'त्या' अपघात प्रकरणी गुन्हा दाखल; एका पोलिस कर्मचाऱ्याचा झाला होता मृत्यू
Motorcycle Crash : मोताळा ते नांदुरा रस्त्यावर १७ जून रोजी झालेल्या दुचाकी धडकप्रकरणात एका पोलिस कर्मचारीचा मृत्यू झाला. या घटनेत आरोपी कलीम करीम खान याच्या विरोधात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा : भरधाव दुचाकीच्या धडकेत दुसऱ्या दुचाकीवरील एक पोलिस कर्मचारी ठार तर, एक जण जखमी झाल्याची घटना १७ जूनच्या दुपारी मोताळा ते नांदुरा रस्त्यावरील आडविहीर फाट्यानजीक घडली होती.