esakal | राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी सहा वर्षांपासून बंद
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी सहा वर्षांपासून बंद

राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी सहा वर्षांपासून बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील राजे संभाजी चौकातील गेली सहा वर्षे बंद असलाली महामार्ग पोलिस चौकी वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी सुरू करणे गरजेचे आहे. (Police outposts on national highways have been closed for six years)


अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतूक नियंत्रीत व्हावी, अपघातग्रस्तांना वेळेत मादत मिळावी, या हेतूने चौकी निर्माण करण्यात आली होती. त्याठिकाणी पोलिस प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या नेमणुका सुद्धा केल्या होत्या. परंतु सहा वर्षांपूर्वी ही चौकी बंद झाली. वाहातूक अनियंत्रितझाली. अपघातांचे प्रमाण वाढले.

या पोलिस चौकीचा कोणी वाली नसल्याने पोलिस चौकी समोर वाहने बिनधास्त उभी रहातात. वाहतूक विस्कळीत होते. अपघातांना निमंत्रण मिळते. ही चौकी बंद झाल्यामुळे या महामार्गावर बाळापूर पासून नागझरी पर्यंतच्या ११० किलोमिटर अंतरादरम्यान एकही चौकी नसल्यामुळे ही चौकी पूर्ववत सुरू करावी, आशी मागणी जोर धरत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Police outposts on national highways have been closed for six years

loading image