
मास्क न वापरणाऱ्या ७५ नागरिकांवर पोलिसांची कारवाई
अकोला ः संकट कितीही गंभीर असले तरी निष्काळीपणे वागून स्वतःसह इतरांनाही संकट टाकणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध रविवारी ७६ गुन्हे दाखल झाले तर ७५ नागरिकांना माक्स न वापरल्यामुळे दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला.
कोरोना संसर्गाचे संकट वाढतच आहे. परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. ऑक्सिजन बेट रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. असे असतानाही जिल्ह्यात निष्काळजीपणे वागणाऱ्या नागरिकांची संख्या कमी नाही. त्यामुळेच पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे.
रविवारी अशा ७५ नागरिकांना पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागले. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून दुचाकीवर ट्रिपल सिट जाणाऱ्या १७ चालकांवरही कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यात ७६ गुन्हे दाखथल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रविवारी १६ हजार ६०० रुपये दंड वसुल केला
संपादन - विवेक मेतकर
Web Title: Police Take Action Against 75 Citizens For Not Wearing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..