जय शिवराय अन् जय श्रीरामवरून रंगले राजकीय नाट्य, शिवसेनेचे उपराष्ट्रपती नायडूंविरोधात तर भाजपचे शरद पवारविरोधात आंदोलन

मनोज भिवगडे 
Friday, 24 July 2020

राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून शिवसेनेने उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या विरोधात तर राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का, असा प्रश्‍न उपस्थित करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात भाजपने शुक्रवारी आंदोलन केले.

अकोला  ः राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून शिवसेनेने उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या विरोधात तर राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का, असा प्रश्‍न उपस्थित करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात भाजपने शुक्रवारी आंदोलन केले.

राज्यसभेत छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना "जय भवानी, जय शिवाजी' असा नारा दिला म्हणून राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावर शिवसेनेने कधीकाळी आपलाच मित्र पक्ष असलेल्या भाजपविरोधात जोरदार निदर्शने राज्यभर सुरू केली आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोल्यातही शुक्रवारी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी उपराष्ट्रपती नायडू यांना प्रतिकात्मक काठीमार आंदोलन केले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, असे नारेही देण्यात आले. नायडू यांच्याविरोधातही नारेबाजी करण्यात आली. महिला शिवसैनिकांनी उपराष्ट्रपती नायडू यांना प्रतिकात्मक चपला मारून निषेध नोंदविला.

या आनंदोलनात प्रतिकात्मक व्यंकया नायडू म्हणून योगेश अग्रवाल यांनी भूमिका वठवली. यावेळी शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवणीकर, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरुमकार, जिल्हा सचिव प्रदिप गुरुखुद्दे, गजानन चव्हाण, देवश्री ठाकरे, जि.प. सदस्य गायत्री कांबे आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.

तत्पूर्वी, भाजयुमोच्या वतीने शुक्रवारी सकाळी मुख्य डाक घरापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. राम मंदिराच्या भूमिपुजनाबाबत पवार यांनी व्यक्त केलेल्या मतावरून हे आंदोलन करण्यात आले. राम मंदिर हे हिंदू धर्माचे एक अस्मितेचे ठिकाण, त्याबाबत बोलून पवारांनी जी ठेच पोचवली आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून भाजयुमो अकोला महानगरतर्फे प्रभू श्री रामाच्या नावाची आठवण करून देण्यासाठी शरद पवार यांना पत्र पाठवण्यात आले. अकोला येथील मुख्य डाक घर येथून शेकडो पत्र त्यांना पाठवण्यात आले.

आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर अर्चना मसने, स्थयी समिती सभापती सतिश ढगे, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, भाजयुमो महानगर अध्यक्ष उमेश गुजर, अभिजीत बांगर, सागर भुरे, नीलेश काकड, देवशीष काकड यांच्यासह पदाधिकारी व सर्व मंडळध्यक्ष, कार्यकरणी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political drama based on Jai Shivrai and Jai Shriram in Akola Shiv Sena agitation against Vice President Naidu and BJP agitation against Sharad Pawar