esakal | तिकीटासाठी रस्साखेच सुरू; राजकीय सामना रंगणार
sakal

बोलून बातमी शोधा

Political match will be played, Prakash Ambedkars visit to Vanchit continues

जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांवर संधी मिळावी, यासाठी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीमध्ये राजकीय घडामोळींना वेग आला आहे. निवडणुकीत संधी मिळावी यासाठी दाेन-तीन दिवसांपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी इच्छुकांनी त्यांच्या बंगल्यावर गर्दी केली हाेती.

तिकीटासाठी रस्साखेच सुरू; राजकीय सामना रंगणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांवर संधी मिळावी, यासाठी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीमध्ये राजकीय घडामोळींना वेग आला आहे. निवडणुकीत संधी मिळावी यासाठी दाेन-तीन दिवसांपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी इच्छुकांनी त्यांच्या बंगल्यावर गर्दी केली हाेती. यावेळी निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्यांनी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले.

जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेतील नामाप्र (ओबीसी) प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितींच्या २८ जागांवर गडांतर आले आहे. संबंधित जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून येणार असल्याने आता राजकीय घडामोळींना वेग आला आहे.
---------------
राजकीय अस्थिरता; सत्ता टिकवण्याचे आव्हान
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांच्या सदस्य पदाला ग्रहण लागले आहे. त्यामध्ये सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या आठ सदस्यांमध्ये दानापूर, अडगाव, तळेगाव, कुरणखेडच्या, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला येथील सर्कलचा समावेश आहे. भाजपच्या कुटासा, बपोरी व घुसर येथून निवडून आलेल्यांची पदे सुद्धा रिक्त झाली आहेत. कॉंग्रेसचे अकोलखेड, शिवसेनाचे लाखपूरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी झालेल्या दगडपारवा येथील सर्कलची जागा रिक्त झाली आहे. दरम्यान निवडणुक झाल्यानंतर कमी सदस्य निवडणू आल्यास त्याचा फटका सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला बसु शकतो.
------------
महिला आरक्षणामुळे बदलले समीकरण
जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सर्कल असलेले तळेगाव, कुटासा, बपाेरी, दगडपारवा, अडगाव, कानशिवणी व अंदुरा हे सर्कल महिलांसाठी राखीव झाले आहेत. उर्वरित सर्कल हे महिला आरक्षणातून सुटले आहेत. त्यामध्ये कुरणखेड, देगाव, शिर्ला, अकोलखेड, लाखपुरी, घुसर, दानापूरचा समावेश आहे. महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलले असून काही जणांनी घरातील महिला सदस्यांना पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
----------------
जुन्यांना संधीची अपेक्षा
यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुटासा सर्कल महिलांसाठी राखीव हाेते. तेथून भाजपच्या काेमल पेटे विजयी झाल्या हाेत्या. तळेगाव सर्कलही स्त्रीसाठी राखीव हाेते. येथून संगीता अढावू निवडून आल्या हाेत्या. दगडपारवाही राखीव झाले असून, यापूर्वी राकॉंच्या सुमन गावंडे विजयी झाल्या हाेत्या. बपाेरी सर्कलही महिलांसाठी राखीव झाले आहे. तेथून भाजपच्या माया कावरे विजयी झाल्या होत्या. अडगाव सर्कल महिला राखीव झाले असून, यापूर्वी वंचितच्या प्रमोदिनी कोल्हे विजयी झल्या हाेत्या. त्यामुळे पोट-निवडणुकीतही पक्षश्रेष्ठी आपल्याच संधी देतील, अशी अपेक्षा संबंधित लावून बसले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image