प्रशासक पदासाठी गावागावात रस्सीखेच, संघटनाही सरसावल्या

For the post of Akola administrator, not only the ropes but also the organizations rushed to the villages
For the post of Akola administrator, not only the ropes but also the organizations rushed to the villages

नांदुरा (जि.बुलडाणा)  ः कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीतील मुदत संपणाऱ्या राज्यातील 19 जिल्ह्यातील 1566 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.या सर्व ग्रामपंचायतीवर निवडणुका होइपर्यंत प्रशासक बसविण्यात येणार असून, प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

अर्थात या नियुक्‍त्या पालकमंत्री यांच्या सल्ल्यानुसार करण्याचे परिपत्रक धडकल्याने गावगावच्या स्थानिक सत्तेतील व विरोधातील राजकीय मंडळींना आपणच कसे यासाठी सरस ठरणार याचे पाढे स्थानिक आमदार व पालकमंत्र्याच्या मर्जीतील नेत्यांकडे वाचणे सुरू केले असतांनाच अनेक संघटनांनीही प्रशासक पदाच्या आखाड्यात उडी घेतल्याने यात उत्कंठा वाढविली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींपैकी 527 ग्रामपंचायतीची मुदत या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक पदाची नियुक्ती करण्याचे परिपत्रक धडकल्याने गावागावात सद्या राजकीय चर्चाना उत आला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची रंगीत तालीम ठरणाऱ्या या प्रशासक पदासाठी गावागावातील स्थानिक गावपुढाऱ्यांनी राजकीय वर्चस्व पणाला लावून यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. असे असतांनाच सद्यस्थितीत असलेल्या सरपंचांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनाच यासाठी पात्र ठरवावे. किंवा मुदतवाढ द्यावी यासाठी प्रयत्न सुरू केले असून, पोलिस पाटील संघटना, पत्रकार संघटना, वकील मंडळी व इतर अनेक संघटनांनी प्रशासक पदाच्या नियुक्तीत उडी घेत शासनालाच कोंडीत पकडण्याची नामी संधी शोधली आहे.

या जर तरच्या नियुक्तीत प्रशासकाची निवड खऱ्याअर्थी कशी होईल हे जरी कोडे असले तरी स्थानिक आमदार व पालकमंत्र्यांच्या भेटीला गर्दी वाढत असल्याने सर्वांना खुश ठेवण्यासाठी प्रशासक नेमतांना तारेवरची कसरत आमदार व पालकमंत्र्यांना करावी लागणार हेच सद्या दिसून येत आहे.

प्रशासक पदाच्या शर्यतीतील ग्रामपंचायती
शेंबा बु, शेंबा खुर्द, टाकरखेड, जवळा बाजार, सुलज, बेलुरा, मेंढळी, वसाडी, तांदुळवाडी, माळेगाव गोंड, पिंपळखुटा खु, खडदगाव, भुईसिंगा, महाळुंगी, अलमपूर, धानोरा बु, येरळी, वाडी, रसुलपूर, खैरा, बेलाड, वडी,

वडाळी,नारखेड,पिंपळखुटा धांडे, लोणवाडी,शेलगाव, मुकुंद, दादगाव, आंबोडा, पोटळी, विटाळी, दिघी,धानोरा, नायगाव, काटी, वडनेर भोलजी, खुमगाव, सिरसोडी, मोमीनाबाद, दहिगाव,चांदुरबिस्वा, मामुलवाडी, इसबपूर,पलसोडा, जिगाव,टाकळी वतपाळ, हिंगणे गव्हाळ, सावरगाव नेहू,वसाडी खु. या ग्रामपंचायती आहेत.

सध्या राज्यात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका स्थगित ठेवण्यात आल्या आहे. निवडणूक होईपर्यंत प्रशासक या ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार असून, गावातील स्थानिक व्यक्तीची निवड केली जाणार असल्याने स्वच्छ प्रतिमेच्या, होतकरू सुशिक्षित, नवीन राजकीय क्षमता ठेऊन गावाची प्रगती साधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवयुवकाला संधी देण्यासोबतच पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीला किंवा घराणेशाहीला बगल देऊन उभरते नेतृत्व उभे करण्याची ही संधी चालून आली आहे. त्यासाठी योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड होणे गरजेचे आहे.
-श्रीकृष्ण पाटील, नागरिक,शेंबा.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com