राजमाता माँ साहेब जिजाऊ महिला विद्यापीठासाठी ‘बारामती’तून बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power from Baramati for Rajmata Maa Saheb Jijau Womens University

राजमाता माँ साहेब जिजाऊ महिला विद्यापीठासाठी ‘बारामती’तून बळ

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राजमाता माँ साहेब जिजाऊ (Rajmata Maa Saheb Jijau) यांच्या नावे महिला विद्यापीठ (Womens University) उभारण्यासाठी बारामतीच्या अखिल भारतीय मराठा महासंघाने (Maratha Federation) पाठिंबा जाहीर केला आहे. थेट बारामतीतून बळ मिळाल्याने महिला विद्यापीठाचा (Womens University) लढा अधिक व्यापक होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर पवळ यांनी यापूर्वी या मागणीपूर्तीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, राज्यपाल, शरद पवार, उपमुख्यमंत्री, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिले आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे देशातीलच नव्हे तर दक्षिण-पूर्व आशियातील पहिले महिला विद्यापीठ आहे. महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी १९१६ मध्ये महिला शिक्षणासाठी याची मुंबईत स्थापना केली. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, शिक्षण असे उद्दिष्ट साध्य केले जात आहे. या प्रवाहाचा झरा विदर्भात अपेक्षित प्रमाणात पोहचू शकला नाही.

हेही वाचा: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून खून

ही परिस्थिती बदलण्यासाठी या भूमीतही महिला विद्यापीठाची गरज लक्षात घेता रामेश्वर पवळ यांनी राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या नावे सिंदखेडराजा येथे महिला विद्यापीठ उभारण्याची मागणी लावून धरली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रस्ताव सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही लक्ष वेधले. बुलडाणा जिल्हा परिषदेला मागणीचे महत्त्व पटवून दिले. यानंतर महिला विद्यापीठ उभारणीच्या दृष्टीने ठराव घेण्याची घोषणा करण्यात आली.

यासोबत पवळ यांनी तज्ज्ञांच्या भेटी घेऊन विद्यापीठ उभारणीसाठी हालचालींना गती दिली. त्यांच्या या प्रयत्नांची वार्ता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीपर्यंत पोहचली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना बळ देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती शहर व तालुका शाखेने तत्काळ संपर्क साधला. विद्यापीठ उभारणीमागची भूमिका जाणून घेत आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे जाहीर केले.

हेही वाचा: कोरोनाच्या तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज; अजित पवार

‘विद्यापीठ उभारणे गौरवाची बाब’

माँ जिजाऊ यांच्या नावे सिंदखेडराजात महिला विद्यापीठ उभारण्याची मागणी करीत रामेश्वर पवळ यांनी एक सकारात्मक सुरुवात केली आहे. आता राज्यातील प्रत्येक जिजाऊप्रेमीने या मागणीला बळ देण्याची गरज आहे. पक्ष, संस्था, संघटनांनी एकजुटीने काम करण्याची गरज मराठासेवा महासंघ शाखा बारामतीचे अध्यक्ष उदयसिंह देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Baramatiwomens
loading image
go to top