बोगस लाभार्थ्यांकडून ६.१७ कोटी वसुलीचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradhan Mantri Kisan Sanman Yojana; Challenge of recovery of Rs 6.17 crore from bogus beneficiaries

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत बनवेगिरी करुन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून थकीत रक्कम वसुल करण्यास प्रशासनाला अल्प यश मिळत आहे. त्यामुळे बनवेगिरी करणाऱ्यांकडून आतापर्यंत १ कोटी ६५ लाखच वसुल करण्यात आले आहेत, तर ६ कोटी १७ लाख रुपये वसुल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

बोगस लाभार्थ्यांकडून ६.१७ कोटी वसुलीचे आव्हान

अकोला  ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत बनवेगिरी करुन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून थकीत रक्कम वसुल करण्यास प्रशासनाला अल्प यश मिळत आहे. त्यामुळे बनवेगिरी करणाऱ्यांकडून आतापर्यंत १ कोटी ६५ लाखच वसुल करण्यात आले आहेत, तर ६ कोटी १७ लाख रुपये वसुल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यातील बोगस लाभार्थी शोधण्याचे आदेश दिले. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यासोबत काही शेतकऱ्यांच्या खात्यात सहा ते सात हप्ते सुद्धा जमा करण्यात आले आहेत. परंतु योजनेचा लाभ तब्बल ४ हजार २३५ सरकारी नोकर, टॅक्स भरणाऱ्या मोठ्या व्यवसायिक शेतकऱ्यांनी घेतला असून ६ हजार १९ अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसुल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन करत असून त्यांना त्यात फारसे यश मिळत नसल्याचे वास्तव आहे.
----------------
आहे आहे वसुली
बोगस लाभार्थ्यांसह टॅक्स भरणाऱ्या १० हजार २५४ लाभार्थ्यांकडून जिल्हा प्रशासनाला ७ कोटी ८३ लाख ८६ हजार रुपये वसूल करायचे आहेत. परंतु अद्याप केवळ १ कोटी ६५ लाख ९२ हजार रुपयेच वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित ६ कोटी १७ लाख ९४ हजार रुपये वसूल करण्यासाठी प्रशासनाला कस लागत आहे.
--------------
अशी आहे वसुलीची स्थिती
- वसुलीस पात्र बोगस लाभार्थी - १० हजार २५४
- रक्कम वसुल करण्यात आलेले लाभार्थी - १ हजार ८९९
- रक्कम वसुली शिल्लक लाभार्थी - ८ हजार ३५५
- वसुली शिल्लक रक्कम - ६ कोटी १७ लाख ९४ हजार
-------------
अशी आहे तालुकानिहाय वसुलीची रक्कम
तालुका रक्कम
अकोला ९० लाख २० हजार
अकोट ७८ लाख
बाळापूर १ कोटी १८ लाख ७८ हजार
बार्शीटाकळी २ कोटी ५ लाख ३४ हजार
मूर्तिजापूर ५० लाख ७४ हजार
पातूर ३० लाख ४ हजार
तेल्हारा ४४ लाख ८४ हजार
-------------------------------------
एकूण ६ कोटी १७ लाख ९४ हजार

(संपादन - विवेक मेतकर)

Web Title: Pradhan Mantri Kisan Sanman Yojana Challenge Recovery Rs 617 Crore Bogus Beneficiaries

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaBarshitakaliBalapur