
मलकापूर : नगर परिषद हद्दीतील चाळीसबिघा परिसरात गत् काही वर्षापुर्वी गणेश नगरस्थित शांती आरोग्यम् हॉस्पीटल बांधण्यात आले. मात्र हॉस्पिटलचे बांधकाम नगर परिषदची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आली असा आरोप करत संबंधित बांधकाम धारकावर कार्यवाही करावी या मागणीसाठी ता. ५ मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने न.प. प्रशासनाचा निषेध करीत चक्क गाढव आंदोलन करण्यात आले.