साहेब, चला पटकन, दंगल भडकली अन् वाचा पुढे काय झाले

भगवान वानखेडे
Thursday, 27 August 2020

साहेब...साहेब सराफा चौकात दंगल भडकली असा फोन येताच अकोला पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्षणात परिस्थिती नियंत्रणातही आली. काही वेळानंतर लक्षात आले की,

अकोला : साहेब...साहेब सराफा चौकात दंगल भडकली असा फोन येताच अकोला पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्षणात परिस्थिती नियंत्रणातही आली. काही वेळानंतर लक्षात आले की, ही दंगाकाबू पथकाची रंगीत तालीम होती. 

सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफा चौक या ठिकाणी हिंदू-मुस्लिमांमध्ये महिलेच्या छेडखानीवरून हाणामारी आणि तुफान दगडफेक सुरू असल्याचा बनावट काॅल येताच पोलिस निरीक्षकांसह दंगाकाबू पथकाने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशान्वये बुधवारी (ता.२६) दंगाकाबू पथकाची रंगीत तालीम सराफा चौकात पार पडली.
दंगल हाताळण्यासाठी बुधवारी रंगीत तालीम घेण्यात आली.

हाणामारी सुरू झाल्याचा बनावट काॅल नियंत्रण कक्षात जातच पंधरा मिनिटांत सराफा चौकामध्ये पोलिस निरीक्षक उत्तम जाधव, दंगाकाबू पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रितेश दिक्षीत, कपडा बाजार चौकामध्ये पीएसआय सुरज सिरसाठ, पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, विजय नाफडे, डी.सी. खंडेराव, भानुप्रताप मडावी, रामेश्वर चव्हाण, प्रकाश पवार आदी पोलिस अधिकारी हजर होऊन चौका-चौकात बंदोबस्त लावण्यात आला.

तसेच चिवचिव बाजार येथे आर्म गार्डसह बंदोबस्त लावण्यात आला. या तालमीमध्ये दहा अधिकारी, ८५ कर्मचारी यांनी भाग घेतला होता.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations of riot squad in Akola