esakal | जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, बाळापूर, तेल्हारा तालुक्‍यात मुसळधार; नदी-नाल्यांना पूर
sakal

बोलून बातमी शोधा

Presence of heavy rains in the akola district, torrential rains in Balapur, Telhara taluka; Floods of rivers and streams

बाळापूर आणि तेल्हारा तालुक्‍यासह जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मंगळवारी मध्यरात्री सुरू झालेला संततधार पाऊस कमी-अधिक प्रमाणात सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू होता. त्याचा सर्वाधिक फटका तेल्हारा आणि बाळापूर तालुक्‍याला बसला.

जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, बाळापूर, तेल्हारा तालुक्‍यात मुसळधार; नदी-नाल्यांना पूर

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला  ः बाळापूर आणि तेल्हारा तालुक्‍यासह जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मंगळवारी मध्यरात्री सुरू झालेला संततधार पाऊस कमी-अधिक प्रमाणात सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू होता. त्याचा सर्वाधिक फटका तेल्हारा आणि बाळापूर तालुक्‍याला बसला.

या दोन्ही तालुक्‍यातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या आलेल्या पुराने मुख्य मार्गही काही तासांसाठी बंद पडले होते. अकोला शहरात सकाळी 11 वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने उसंत घेतली.

बाळापूर : तालुक्‍यातील लोहारा येथे पुलावर पाणी असल्याने अकोट-शेगाव मार्ग चार तास बंद होता.

बाळापूर तालुक्‍यात मुख्य रस्ते पाण्याखाली
संततधार पावसामुळे तालुक्‍यातील नद्या-नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून गेली. शिवाय, तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. तर काही ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली आहे. बाळापूर तालुक्‍यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाली होती. लोहारा येथील ब्रिटिशकालीन पुलावर दहा ते बारा फूट पाणी आल्याने शेगाव-अकोट मार्ग बंद पडला होता. तालुक्‍यातील सात ही मंडळात 45.17 मि. मी. पावसाची नोंद झाली. बाळापूर 80, पारस 60, वाडेगाव 29, व्याळा 18, उरळ35 , निंबा 45 व हातरूण 49 मी. मी. पाऊस झाली. लोहारा पुलावरून पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र आज बुधवारी सकाळी अकरा वाजता पाणी ओसरल्याने चार तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली. मात्र पावसामुळे लोहारा पुलाचे कठडे वाहून गेले.भांबेरी ः मुसळधार पावसाने तेल्हारा तालुक्‍यातील भांबेरी परिसरात शेतात साचलेले पाणी.
तेल्हारा तालुक्‍यात नदी-नाल्यांना पूर
तेल्हारा तालुक्‍यात काही ठिकाणी मंगळवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान तर काही ठिकाणी बुधवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली. परिसरातील भांबेरी, मनब्दा, अटकळी, टाकळी, दापुरा निंबोळी, पंचगव्हाण, दहिगाव, खापरखेड, थार, नेर, वळगाव-रोठे, जस्तगाव, पाथर्डी, शेरी, माळेगाव, हिवरखेड यासह संपूर्ण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यानां मोठ्या प्रमाणात पूर गेला. यामध्ये बऱ्याच ठिकाणी विविध शेती पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


तेल्हारा ः शहरातील जिल्हा बॅंकेच्या शाखा कार्यालय परिसरात साचलेले पाणी.
तेल्हारा शहरात पाणीच पाणी बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने तेल्हारा शहरातील जिल्हा मध्यवर्ती बॅंक , खरेदी-विक्री शिवाजी हायस्कूल, सुपर व्हिजन सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरासह, काटेज जिन परिसरात पाणी साचले होते.