शेतीपयोगी साहित्याचे दर भिडले गगनाला

शेतकऱ्यांवर पुन्हा नवे संकट, शेतीचे बजेट कोलमडले
akola
akolasakal media

शिरपूर : सर्वच घटकाचे दर वाढत असल्याने शेतीपयोगी साहित्याचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत. त्यामुळे येत्या हंगामात शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.गारपीठ, अतिवृष्टी, निसर्गाची अवकृपा शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नाही.

एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे सुलतानी संकटाने शेतकरी वर्गास ग्रासले आहे. संपूर्ण खरीप हंगाम जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वाया गेला आहे. शासनाकडून मदत घोषित झाली. मात्र, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशा अनेक अडचणी असतानाच आता शेतीपयोगी साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे साहित्य पीव्हीसी पाईप, स्पिंकलरचे पाईप, ठिबक संच, रासायनिक खते, कीटकनाशके तसेच पेट्रोल-डिझेल या सर्वच निविष्ठांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट या वाढलेल्या दरामुळे कोलमडणार आहे. बाजारामध्ये सर्वच निविष्ठांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शेतमालाचे भाव मात्र कमी होताना दिसत आहेत. दोन महिन्यापूर्वी अकरा हजार रुपये असा उच्चांकी दर सोयाबीनला होता. मात्र, शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारामध्ये आल्यानंतर बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली कोसळले आहेत. यामध्ये केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम या ठिकाणी दिसून आला आहे.

केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर बसत असल्याचे दिसून येत आहे. आता शेतकऱ्यांची रब्बीची लगबग सुरू झाली आहे. खते, बियाणे, शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. बाजारामध्ये सध्या पीव्हीसी पाइप, स्पिंकलर पाईपचे दर या महिन्यात सात टक्क्यांनी वाढले आहेत. रासायनिक खतांचे दर २० ते २० टक्यांनी वाढले आहेत. डिझेल, पेट्रोल दर वाढल्याने शेतीच्या मशागतीच्या खर्चात वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे येणारा काळ शेती व्यवसायासाठी निश्चितच कठीण असणार आहे. शासनाने शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी योग्य पाऊल उचलणे काळाची गरज बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com