टोमॅटो रोपाची बँड लावून मिरवणूक

यावर्षी विक्रमी दर मिळाल्याने व्यक्त केला आनंद
Procession with band
Procession with bandSakal
Updated on

वाशीम - मिरवणूक म्हटले की राजकीय पक्ष किंवा लग्नाची वरात डोळ्यासमोर येते. मात्र वाशीम तालुक्यातील देपूळ येथील शेतकऱ्याने टोमॅटोला यावर्षी विक्रमी दर मिळाल्याने चक्क टोमॅटोच्या रोपाची गावात मिरवणूक काढली. मागील दोन वर्षात कोरोनामुळे टोमॅटोला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होते. मात्र यंदा टोमॅटो पिकाला चांगले दर मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यातील देपूळ येथील ऋषिकेश गंगावणे यांनी दीड एकरात टोमॅटोची लागवड केली. त्यांना यापासून एक हजार कॅरेट टोमॅटोचे उत्पन्न मिळाले व त्याला ७०० ते एक हजार रुपये कॅरेट प्रमाणे दर मिळाले. यामधून त्यांना एक लाख लागवड खर्च वगळता ७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.त्यामुळं त्यांनी टोमॅटोच्या रोपाची बँड लावून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. देपुळ गावात सिंचनाची सोय असल्याने शेतकरी भाजीपाला लागवड करतात.

मात्र भाजीपाला पिकातून फारस उत्पन्न मिळत नाही. यंदा ऋषिकेश गंगावणे यांनी निवड केलेल्या टोमॅटोपासून एक हजार कॅरेटच उत्पन्न मिळालं शिवाय चांगले दर मिळाले आहेत. त्यामुळं मागील दोन वर्षात झालेलं नुकसान भरून निघालं आहे. यंदा टोमॅटोला चांगले दर मिळाल्यांमुळे मी आनंदी झालो आहे त्यामुळे ही मिरवणूक काढली असल्याचे गंगावण यांनी सांगितले. भाजीपाला पिकाला भाव मिळत नाहीत, त्यामुळं उत्पादन खर्च ही वसूल होत नसल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याच आपण नेहमी बघतो. मात्र देपुळ येथील शेतकऱ्यांनी चक्क बँड लावून मिरवणूक काढल्यामुळे पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com