
अकोला : अनुसूचित जाती व नवबाैद्ध वस्तीचा विकास करणे याेजनेअंतर्गत कामांचे प्रस्ताव रद्द केल्याचा मुद्दा तापणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराेधात भूमिका घेणार असून जि.प प्रशासनाला राज्याचा समाज कल्याण विभाग सादर केलेल्या प्रस्तावांबाबत काेणता निर्णय घेते, याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे दलित वस्तीची कामे रद्द केल्याचा मुद्दा तापणार असल्याचे दिसून येत आहे.