अकोला : शहरात पर्यावरणपूरक आणि ऊर्जा स्वावलंबी यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी, सौरऊर्जा प्रकल्प बसवणाऱ्या घरगुती व व्यावसायिक मालमत्ताधारकांना मालमत्ता करात किमान ५% सवलत देण्यात यावी, अशी मागणी निलेश देव मित्र मंडळ आणि अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.