esakal | ‘सेफ झोन’ संदर्भात ॲड. आंबेडकर जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

prakash ambedkar 01.jpg

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोनाने महानगरात थैमान घातलं असलं तरी ग्रामीण भागा कोरोनापासून दूर आहे. अशा सेफ झोनचा कोरोनापासून येणाऱ्या काळात बचाव करा. त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवा व जीएमसीच्या डॉक्टरांवर ताण वाढत असल्याने खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करा या व इतर सूचना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी (ता. ४) प्रत्यक्ष भेटून मांडल्या. 

‘सेफ झोन’ संदर्भात ॲड. आंबेडकर जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोनाने महानगरात थैमान घातलं असलं तरी ग्रामीण भागा कोरोनापासून दूर आहे. अशा सेफ झोनचा कोरोनापासून येणाऱ्या काळात बचाव करा. त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवा व जीएमसीच्या डॉक्टरांवर ताण वाढत असल्याने खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करा या व इतर सूचना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी (ता. ४) प्रत्यक्ष भेटून मांडल्या. 

जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेवर गेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोरोना बद्दल भिती निर्माण झाली आहे. त्यातच लॉकडाउनचे नियम आता शिथिल होत असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरक्षित असलेले क्षेत्र (सेफ) पुढील काळात असुरक्षित होण्याती दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या या बाबीकडे लक्ष द्यावे. त्यासोबच गडचिरोलीमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्यामुळे त्याजिल्ह्याला शासनाने दिलेल्या पीपीई कीट आपल्या जिल्ह्यात उपायोग आणाव्या.

या पुढील काळात एसटी बस सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग व परप्रांतातील नागरिक जिल्ह्यात येतील. त्यामुळे अशा नागरिकांची तपासणी करण्याची विशेष व्यवस्था करावी. मजूर व रेशन कार्ड नसलेल्यांना धान्याचे वापट करावे, अशा सूचना यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, प्रदीप वानखडे, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी, सभापती पंजाबराव वडाळ, प्रसन्नजीत गवई, पराग गवई व इतर पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते. 

उपाययोजना राबविण्यासाठी दिले निवेदन
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात होत असलेली वाढ चिंताजनक आहे. जिल्ह्यात जॉन हॉफकिन्स इन्स्टिट्यूट व जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यासाठी यापुढील काळात राबविण्याच्या उपाययोजनांसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी पापळकर व मनपा आयुक्त कापडणीस यांना निवेदन दिले. 

‘जीएमसी’ला भेट; अधिष्ठातांसोबत चर्चा
जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी दिल्यांनी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्यासह इतर डॉक्टरांसोबत कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात चर्चा केली. 

loading image