
खामगाव : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शहरात विविध राजकीय पक्ष, आंबेडकरी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.