
अकोला ः कोविड-१९ (Covid-19) चा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी थेट बांधावर बियाणे, खते, कीटकनाशके (Seeds, fertilizers, pesticides) इत्यादी कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्यावे, असे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणेस दिले. Provide seeds, fertilizers, pesticides to the farmers on the field!
जिल्हाधिकारी यांच्या दालनात खरीप हंगाम सन २०२१-२२ नंतरच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी मोनिका राऊत, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के.बी. खोत, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेराणीया आदी अधिकारी सहभागी झाले होते.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, सोयाबीन लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी तसेच सोयाबीन पेरणीबाबत तांत्रिक तपशील हा अधिक सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. त्यासाठी व्हिडीओ तयार करुन समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसुत्री कार्यक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे सांगितले. शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप व पिक विमा या संदर्भात शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्यावा. त्यांना विनाकारण हेलपाटे घालावे लागू नये, तसेच बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी कृषी सेवाकेंद्रांमार्फत होणाऱ्या पेरणीचे नियोजन करुन बियाण्यांचे वितरण व्हावे, असे सुद्धा पालकमंत्र्यांनी सांगितले.
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करा!
प्रत्येक गावात कृषी सेवक हजर असले पाहिजे. तसेच ग्रामीण भागात कार्यरत असलेले कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, बँक कर्मचारी असे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यामार्फत ग्राम विकास कार्यक्रम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले. खते बियाणे यांच्या वाजवी दरात उपलब्धतेबाबतही प्रशासनाने नियोजन करुन दरावर नियंत्रण ठेवावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाकरीता उपाययोजना कराव्या. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळत आहे, याबाबत खातरजमा करावी, असे निर्देशही लकमंत्री बच्चू कडू यावेळी दिले.
विवेक मेतकर
Provide seeds, fertilizers, pesticides to the farmers on the field!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.