

Akola
esakal
अकोला: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक आयडी अनिवार्य करण्यात आला असून ही माहिती संबंधित बँक किंवा सेवा सहकारी संस्थेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधा र व ॲग्रीस्टॅक नोंदणीची माहिती संबंधित बँकेला सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांनी केले आहे.