अकोला - भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात दिनांक ७ ते ९ मे २०२५ दरम्यान विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह विजा आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक तथा शेतकरी, शेतमजुरांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.