esakal | परतीच्या पावसाचा सोयाबीन सोंगनीत अडथळा पण; तुरीच्या पिकाला फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

The rains in Malegaon have benefited the turi crop.jpg

हा पाऊस तुरीच्या झाडाला फुले धरणाच्या वेळेस पडला आहे. त्यामुळे तुरीच्या पिकाला आता चमक आली आहे.

परतीच्या पावसाचा सोयाबीन सोंगनीत अडथळा पण; तुरीच्या पिकाला फायदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (अकोला) : पावसाळ्याच्या चार महिन्यात चांगला पाऊस पडल्यानंतर आता पुन्हा दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता.9) सायंकाळी सहा वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह दहा मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सोयाबीन सोगंनीच्या मधातच आल्यामुळे सोंगनीत अडथळा आला असला तरी तुरीच्या पिकाला फार मोठा याचा फायदा झाला, असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

हा पाऊस तुरीच्या झाडाला फुले धरणाच्या वेळेस पडला आहे. त्यामुळे तुरीच्या पिकाला आता चमक आली आहे. आता तुरीला पाणी देण्याची आवश्यकता नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. दहा दिवसापासून पाऊस नसल्यामुळे तुरीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रिंकलचा सट बाहेर काढून पाणी देण्याची तयारी केली होती. परंतु या पावसाने विहिरीच्या पाण्याची बचत झाली असून ऐन मोक्याच्या वेळी हा पाऊस पडल्याने तुरीच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे .हा पाऊस  मोक्याच्या वेळी व बेताचा सुद्धा  पडला असल्याने  शेतकरी आता तुरीला खत देत  आहेत.

पावसामुळे शेतकर्‍यांचा थोडा उत्साह वाढला आहे. मात्र हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला याची झळसुद्धा पोहोचली आहे. हवामान खात्याने 10 ते 14 तारखेच्या दरम्यान पुन्हा परतीचा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला असल्यामुळे सोयाबीन सोंगच्या कामात वेग आला आहे. आता सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. सोयाबीनच्या पिकाने मात्र यावेळी शेतकऱ्याची घोर निराशा केली आहे. आता शेतकऱ्यांच्या सर्व नजरा रब्बी पिकाकडे व तुरीच्या पिकाकडे लागल्या आहेत. 

संपादन - सुस्मिता वडतिले