DJ Sound : नियम डावलून डिजेचा सर्रास वापर: सर्वसामान्य हैराण

विवाहामध्ये सर्व चालीरीती मोठ्या प्रमाणात असतानाच. प्रत्येक लग्नामध्ये नवरदेव मिरविण्यासाठी व संध्याकाळच्या वरातीसाठी डिजेचा सर्रास वापर केला जात आहे.
DJ Sound
DJ Soundsakal

अकोट - सध्या लगीनघाई जोरात सुरू झाल्याने वरात, लग्न समारंभ यामध्ये डिजे वाजविण्याची प्रथा सुरू झाली असून, या डिजेच्या आवाजामुळे अनेक रुग्णांना व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमात डिजे वाजविण्यास बंदी अथवा आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र यंत्रणा असावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

विवाहामध्ये सर्व चालीरीती मोठ्या प्रमाणात असतानाच. प्रत्येक लग्नामध्ये नवरदेव मिरविण्यासाठी व संध्याकाळच्या वरातीसाठी डिजेचा सर्रास वापर केला जात आहे. डिजेचा वापर करत असताना नवरदेव मिरवताना किमान चार ते पाच तास डिजे गावामध्ये मोठ्या कर्कश आवाजात असतो. गावामध्ये अनेक नवजात तसेच काही महिने वयाची बालके असतात.

काही ठिकाणी काही नागरिकांना हृदय रोग, काहींना उच्च रक्तदाब असल्यामुळे या डिजेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. डिजेचा आवाज एवढा कर्कश असतो की, किमान एक ते दोन किलोमीटर अंतरावरील घरातील भांडे सुद्धा थरथर करत असल्याताचे अनेकजण सांगतात. कोरोना काळात कुठलीही वरात नाही, डिजे नाही, अशा परिस्थितीमध्ये अनेकांची लग्ने झाली. त्यावेळेस मात्र, कुठल्याही नागरिकांना याचा त्रास झाला नाही व विवाहासाठी कुठली हौस करण्यात आली नाही.

त्या काळात झालेले लग्न आजही स्मरणात आहेत. डिजेमुळे हळदीला रात्री दोन-तीन वाजेपर्यंत वरातीपुढे डिजे वाजवला जातो. अनेकांना झोपा लागत नाही. लहान-लहान मुलं रडतात, काहींना या आवाजामुळे छातीमध्ये दुखते याचा कोणीही विचार करत नाही, हे सर्व घडत असताना शासकीय अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय? असाही प्रश्न निर्माण होतो.

लग्नात वाढते डिजेचे फॅड धोक्याचे

सध्या लग्नसराईत ब्रास बँड किंवा अन्य वाजंत्री ऐवजी डिजे लावला जातो. लग्नसराईत एकाच वेळी दोन, चार डिजे वाजविले जातात. यामुळे ध्वनी प्रदूषण २०० डेसीबलच्या पुढे जाते. मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी पोलिसांकडून परवानगी काढावी लागते. याकडे कोणी सहसा लक्ष देत नाही. शुभ कार्यात विघ्न नको म्हणून पोलिसही परवानगी आहे किंवा नाही याकडे लक्ष देत नाहीत. यामुळेच ध्वनी प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे.

पोलिसांकडे यंत्रणा नाही

शहरात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही. फक्त उत्सव व मोठ्या मिरवणूक काळातच जिल्ह्यातून ध्वनी मोजमाप यंत्रणा मागविली जाते.

आवाजाची तीव्रता

आवाजाची तीव्रता चार विभागांत गणली जाते. औद्योगिक वसाहतीमध्ये दिवसा ७५ डेसीबल, तर रात्री ७० डेसीबल, कर्मशिअल झोनमध्ये दिवसा ६५ व रात्री ५५ डेसीबल, रहिवासी क्षेत्रात ५५ व रात्री ४५ डेसीबल, सायलेन्स झोनमध्ये दिवसा ५० व रात्री ४० डेसीबलचे निकष आहेत.

वाद्य वाजवितांना आवाजाची मर्यादा पाळावी. शहरात वरात काढतांना वाहतुकीला अडथळा निर्माण केला किंवा आवाजाची मर्यादा ओलांडली तर कायदेशीर कारवाई करू. मंगल कार्यालय आणि डिजे संचालक यांना आधीसुद्धा नोटिसा बजावल्या आहेत.

- तपन कोल्हे, शहर पोलिस निरीक्षक, अकोट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com