
अकोला : नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रयागराज येथे आयोजित देश, विदेशातील संत महंतांच्या महाकुंभ मेळ्याच्या वेळीच नभोमंडपातही ग्रह-तारकांचा अनोखा मेळावा एकत्र बघता येईल. विशेष म्हणजे येत्या ७ जानेवारीला ७ घटनांचा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी आणि २५ जानेवारी २०२५ रोजी सूर्यमालेतील सर्व ग्रह एका बाजूला येण्याची दुर्मिळ घटना आकाश प्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी असेल याचा सर्वांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.