esakal | रविकांत तुपकर यांची फटकेबाजी; मैदानावर आणि मैदानाबाहेरही!
sakal

बोलून बातमी शोधा

Ravikant Tupkar's shot; On and off the field!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे रविकांत तुपकर संघटनेचे व सर्वसामान्य जनतेची कामे करूनही मैदानावरही तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांची वक्तृत्वाची व मैदानातील फटकेबाजी हा चर्चेचा विषय ठरत आहे.

रविकांत तुपकर यांची फटकेबाजी; मैदानावर आणि मैदानाबाहेरही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे रविकांत तुपकर संघटनेचे व सर्वसामान्य जनतेची कामे करूनही मैदानावरही तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांची वक्तृत्वाची व मैदानातील फटकेबाजी हा चर्चेचा विषय ठरत आहे.


लॉकडाऊनच्या काळात अनेक नेते, लोकप्रतिनिधी स्वतःला लॉक करून डाऊन झालेले दिसत आहेत. ज्यांच्याकडे सत्ता आणि संपत्ती आहे असे अनेक जण स्वतःला क्वारंटाईन करून बसलेले आहेत. मात्र, अशावेळी शेतकरी संघटनेची बाजू लावून धरणारे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर मात्र सामाजिक कामासोबतच वैयक्तिक खेळाच्या मैदानावरही तुफान फटकेबाजी करीत आहेत. 


सामाजिक कार्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी स्वाभिमानी हेल्पलाईन सुरू केली आहे. या माध्यमातून आजवर हजारो परराज्यातील नागरिकांना व परजिल्ह्यातील लोकांना परवानगी काढून देण्याचे काम असो की सर्वसामान्यांना मदतीची भूमिका असो ते निभावत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करण्यातही  ते सातत्याने पुढे असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातही ते तुफान फटकेबाजी करताना दिसतात ते क्रिकेटचा मैदानावर!

त्यांच्या घराजवळ असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसरात शहरातील त्यांचे काही कार्यकर्ते व मित्र यांच्या सोबत ते सायंकाळी पाच वाजेनंतर क्रिकेटचा आनंद घेऊन स्वतःला फिट राखण्याचा ही प्रयत्न करताना दिसत आहेत. एरव्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सभांमधून गरजत  असताना दिसणारे तुपकर मैदानावरही चेंडूवर तुटून पडताना पाहायला मिळतात. 

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे नेहमी हाताळतात यासाठी त्यांनी स्वाभिमानी हेल्पलाईन सुरू केली आहे. इतर कोणीही घराबाहेर पडो  की न पडो श्री.  तुपकर मात्र दिवसभर या कार्यालयात बसून अनेकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कोरोनाने  संपूर्ण जगाला वेढा घातला आहे.  आपल्या देशातील परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात आहे. मात्र उद्याच्या काळात हे संकट आणखी गडद झाल्यास रक्ताची कमतरता पडू शकते. त्यामुळे शासन प्रशासनाने केलेल्या आवाहनालाही श्री तुपकर यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांनी आपल्या कार्यालयातच रक्तदान शिबिर आयोजित केले 127 जणांनी याठिकाणी रक्तदान केले. विशेष म्हणजे या रक्तदात्यांमध्ये तरूण तरूणींचा व पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांचा वाटा मोठा होता. ही तरूणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी बाब म्हणावी लागेल !
 
जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित आदींनी भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. एकंदरीत काय तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकीय फटकेबाजी सोबतच त्यांची सामाजिक कार्यातील फटकेबाजी व मैदानावरील क्रिकेटमधील फटकेबाजी सध्या चर्चेचा विषय आहे.