

Women's Day
sakal
पातूर : कष्ट, जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या बळावर स्वप्नांना साकार करण्याची प्रेरणादायी कहाणी म्हणजे पातूर शहरातील रेणुका दिनेश केकन. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत रेणुकाने पातूर तालुक्याच्या नावाला नवा मान मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे पातूर तालुक्यातून आयएएस पदावर विराजमान होणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे. तिच्या या यशामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.