डिस्चार्ज झालेल्यांवरच संसर्ग रोखण्याची जबाबदारी 

99.jpg
99.jpg

अकोला  ः कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. असे असले तरी जे रुग्ण बरे होऊन घरी परतणार आहेत. अशा रुग्णांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. कारण, डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या रुग्णांची पुन्हा तपासणी होणार नसल्याने त्या रुग्णांनीच आपल्यामुळ संसर्ग होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्याही सहाशेच्या जवळ जाऊन पोहचत आहे. अशातच आयसीएमआरच्या नवीन नियमावलीनुसार, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी न करता दहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्याचे निर्देश आहेत. ज्या रुग्णांना काही लक्षणे असतील त्यांना संस्थागत अलगीकरण कक्षात निर्देश ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.अशा रुग्णांना होम क्वॉरंटाईन केले जाते. मात्र त्यानंतर आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे त्या रुग्णांकडे दुर्लक्ष होते. परिणामी या रुग्णांकडून समूह संक्रमणाचा सर्वाधिक धोका संभवू शकतो, अशा परिस्थितीत कोरोना या आजारातून पूर्णतः बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.

तुमची एक चूक पडू शकते महागात
होम क्वॉरंटाईन केलेल्या रूग्णांना 14 दिवस घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून इतरांमध्ये मिसळतात. रुग्णांची ही बेफिक्री त्यांच्या कुटुंबासह परिसरातील नागरिकांसाठी घातक ठरू शकते.

डिस्चार्ज घ्या पण, आरोग्य सेतू ॲप्स करा डाउनलोड
रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांनी दिली.

रुग्णांकडून घेतले जाते कलम 144 पत्र
सुटीनंतर रुग्णांनी होम क्वॉरंटाईन च्या नियमांची अंमलबजावणी करावी. या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत त्यांच्याकडून कलम 144 चे पत्र भरून घेतल्या जाते. त्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com