
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. राज्यात कोरोना संसर्ग कमी होत असतानाही राज्य शासनाकडून निर्बंधांची आडकाठी टाकण्यात येत असून, शिवप्रेमींचा हिरमोड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप पदाधिकार्यांनी लावला आहे. दरम्यान, यासंदर्भात गुन्हे दाखल करायचे असतील तर करा परंतु, शिवजयंती धुमधक्यातच करू साजरा करण्यात येईल असा निर्धार केला आहे. दर दुसरीकडे प्रशासनाला निवेदन देऊन विविध सामाजिक संघटनांकडून निर्बंधाचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी होत आहे.
चिखली आमदार श्वेताताई महाले याविरोधात एल्गार पुकारला असून, शिवभक्त कोणत्याही नियम व अटींच्या बंधनात शिवजयंती साजरी करणार नसून, मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होणार असा आशावादही त्यांनी व्यक्त करत आघाडी सरकारने शिवजयंतीनिमित्त घातलेल्या निर्बंधाबद्दल विचार करत निर्बंध तातडीने मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. पुढे त्यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात, कोरोना नसतानाही जर राज्य शासन अटी लादून शिवजयंती साजरी करण्यापासून शिवप्रेमींना रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवभक्त हा प्रकार सहन करणार नाही. (Shiva Jayanti Restrictions Updates)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवज्योत दौंडसाठी २०० आणि जन्मोत्सव सोहळयाकरीता ५०० व्यक्तींना उपस्थित राहता येईल असे परिपत्रक काढले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दारूची दुकाने, बार, हॉटेल यासारखी सार्वजनिक ठिकाणे गर्दीने फुलून जात आहे. मेळावे होत आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव चालत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
गुन्हे दाखल करा : श्वेता महाले
सरकारने शिवजयंतीवर आणलेले निर्बंध तातडीने मागे घ्यावे. सरकारने निर्बंध घेतले नाही तरी, शिवभक्त शिवजयंती मोठ्याप्रमाणात उत्साहात साजरी करणार आहे. याबाबत सरकार कायद्याचा धाक दाखवून शिवभक्तांना शिवजयंती साजरी करण्यापासून परावृत्त करीत आहे. परंतु, सरकारने कितीही धाक दाखवला तरी, सुद्धा शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यातच साजरी होईल. सरकारला काय गुन्हे दाखल करायचे असतील ते त्यांनी करावे. सर्वप्रथम माझ्याविरोधात गुन्हे दाखल करावे असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी प्रसिध्दीपत्रकातून केले आहे.
गृहविभागाचे परिपत्रक तत्काळ रद्द करा ; छावा व शिवसंग्राम संघटनेची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
देऊळगावराजा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ साजरी करण्याच्या बाबतीत शासनाच्या गृह विभागाने काढलेले परिपत्रक तातडीने रद्द करा अशी मागणी शिवसंग्राम संघटना व छावा संघटनेने एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे महाराष्ट्रात नाही तर जगात शिवप्रेमी आहे. आशा जगात नाव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारीला जयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांनी जयंती आनंदाने व कोणताही त्रास न होता उत्सव म्हणून साजरी करतात. मात्र, यावर्षी कोविड-१९ चे कारण देत गृह विभागाने जयंती साजरी करण्या बाबत परिपत्रक काढले आहे.
सदर परिपत्रकातील नियमावलीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्या बाबत बंधने घालण्यात आली आहे. परिपत्रकात नमूद असल्या कारणाने प्रभातफेरी, बाईक रॅली अथवा मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमी मध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. जर राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी तसेच रॅलीसाठी,सत्कार समारंभासाठी,पक्षाच्या बैठकांसाठी कोणतेही बंधन अथवा नियम लावल्या जात नाही असा कुठलाही शासन निर्णय काढल्या जात नाही.मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी परिपत्रक काढून नियमावली लावली जाते,हे पूर्णपणे चुकीचे आहे.सदर परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे.त्यामुळे तत्काळ गृह विभागाने काढलेले परिपत्रक मागे घेऊन महाराष्ट्रातील शिव भक्तांना व शिवप्रेमींना शिवजयंती उत्सव साजरा करण्यास कोणतीही नियमावली न लावता पूर्णपणे परवानगी द्यावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे राजेश इंगळे,जहीर पठाण,अजमत खान,शे.राजू,मराठा क्रांती मोर्चाचे ऍड.सतीश नरोडे,छावा संघटनेचे संतोष राजे जाधव यांच्यासह शिवप्रेमींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.