

Akola Road Accident
esakal
बाळापूर : शेगाव येथील श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन अकोल्याच्या दिशेने परतताना अकोला-बाळापूर महामार्गावरील रिधोरा उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात चेतना चंद्रकांत पारडे (रा. पातूर, सध्या रा. अकोला) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. कारमधील चिमुकली सरायु पारडे व अमोल रखोंडे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.