Covid19 Update : हवामान बदलाचे आरोग्यावर परिणाम; अकोल्यात श्वसन विकारांमध्ये वाढ, कोरोनाचा एकही रुग्ण नाही

Health News : अकोल्यात हवामानात झालेल्या बदलामुळे दमा, न्यूमोनिया व व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Akola Update
Akola UpdateSakal
Updated on

अकोला : शहर व जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, तसेच ‘सारी’ वॉर्डात दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसाशी संबंधित श्वसनविकार, इन्फ्लुएन्झा, एच१एन१ व ‘जेएन वन’ या कोरोनासदृश व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com